‘आता मला रस नाही’, बारामती विधानसभेतून अजित पवार यांची माघार, कोणाला मिळणार संधी?

‘आता मला रस नाही’, बारामती विधानसभेतून अजित पवार यांची माघार, कोणाला मिळणार संधी?

Harshada Shinkar | Updated on: Aug 15, 2024 | 4:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. तर जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळातील मोठी बातमी समोर येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. सात ते आठ वेळा बारामतीमधून निवडणूक लढलो त्यामुळे मला आता रस राहिला नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, बारामतीमधून अजित पवार यांच्याऐवजी जय पवार लढण्याची शक्यता आहे. जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्या बारामतीतील उमेदवारीवर संसदीय मंडळ निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांच्याकडून नव्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सध्या सुरू आहे.

Published on: Aug 15, 2024 4:42 PM
Follow Us