Ajit Pawar Plane Crash Update : शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash Update : शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 30, 2026 | 10:49 AM

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेवटच्या क्षणी पायलटने एटीसीला प्रतिसाद दिला नाही, तसेच विमानाचा नियंत्रण सुटल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतरही पायलटचा प्रतिसाद न आल्याने अपघाताचे कारण गूढ बनले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाल्यानंतर त्यांच्या विमान अपघातासंदर्भात केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, अपघातापूर्वी लँडिंगच्या शेवटच्या क्षणी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला कोणताही प्रतिसाद दिला नाही. बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलांवर असताना विमान VT-SSK ने एटीसीशी संपर्क साधला होता.

पायलटने एटीसीला हवामान आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली होती, ज्यावर एटीसीने वारे शांत असून 3 हजार मीटरपर्यंत दृश्यमानता असल्याचे सांगितले. लँडिंगसाठी तयार असल्याचे सांगूनही पायलटला रनवे दिसत नसल्याचे त्याने नमूद केले. त्यानंतर विमानाने घिरटी घातली. पुन्हा संवाद साधल्यानंतर, 8 वाजून 43 मिनिटांनी लँडिंगची परवानगी देण्यात आली, पण यानंतर पायलटने एटीसीला प्रतिसाद दिला नाही. एका मिनिटातच रनवेच्या बाजूला आगीच्या ज्वाला दिसल्या, ज्यामुळे पायलटने शेवटच्या क्षणी प्रतिसाद का दिला नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Published on: Jan 30, 2026 10:49 AM