विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप

विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप

| Updated on: Feb 18, 2026 | 12:17 PM

अजित पवारांच्या विमानाच्या घटनेवर रोहित पवारांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमानाच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त उड्डाण, जुने इंजिन, पाच मालक आणि सदोष दुरुस्ती यामुळे या अपघातामागे मोठा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हीआयपी सुरक्षेत असतानाही अशा दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

अजित पवारांच्या विमानातील एका घटनेवर आमदार रोहित पवारांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. या विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. कंपनीच्या मते विमानाने ४९१५ तास उड्डाण केले होते, तर केवळ ८५ तास शिल्लक होते. मात्र, प्रत्यक्षात हे विमान ८००० तासांपर्यंत उडल्याचा अंदाज रोहित पवारांनी व्यक्त केला आहे, तर त्याची निर्धारित उड्डाण क्षमता ५००० तास होती.

पवारांच्या म्हणण्यानुसार, हे इंजिन हनीवेल कंपनीने बनवले होते आणि त्या कंपनीकडून डीजीसीएला खरी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. खराब दर्जाचे मशीन मुद्दाम पुरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विमान अनेक मालकांच्या ताब्यातून गेलेले असून, त्याची किंमत १५ कोटींपेक्षा कमी असल्याचा दावाही करण्यात आला आहे. झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीसाठी अशा दुर्लक्षित विमानाचा वापर झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Feb 18, 2026 12:17 PM