Sanjay Shirsat | अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत, संजय शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कथित ऑडिओ क्लिपवरून अंतर्गत नाराजी आणि धुसफूस वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील एका नेत्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा केला जात असून, संबंधित ऑडिओ क्लिप पक्षातीलच एका नेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दाखवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कथित ऑडिओ क्लिपवरून अंतर्गत नाराजी आणि धुसफूस वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील एका नेत्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा केला जात असून, संबंधित ऑडिओ क्लिप पक्षातीलच एका नेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दाखवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीतील वाढत्या मतभेदांवर भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, “अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आता मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एकदा तुटलेली मनं पुन्हा एकत्र येणं कठीण असतं.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “सध्या जो काही प्रकार समोर येत आहे, तो पक्षफुटीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे संकेत देतो. या कारणावरून पुन्हा एकदा अजित दादांच्या पक्षामध्ये मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.” या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.