Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत…; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत…; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं

| Updated on: Aug 01, 2026 | 4:58 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य असल्याचा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला.

माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य आहे. ते फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँडअप कॉमेडियन आहेत.” तसेच, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही नवीन नसल्याचेही त्यांनी म्हटले.

साटम पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांनी भाषणात आरोप केले, पण त्यात नवीन काय आहे? कोणतेही ठोस पुरावे न देता केवळ आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, मनसे आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून ही पहिली तीव्र प्रतिक्रिया मानली जात असून, या वादावर पुढे आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 01, 2026 4:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us