नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

| Updated on: Aug 26, 2026 | 9:48 PM

संकटकाळात भारत नेपाळच्या पाठीशी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे आश्वस्त केलेय. नेपाळच्या महाप्रलयाचा बिहारला धोका, NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांचं एक्स वरचं ही पोस्ट आपण पाहतोय. या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळच्या पाठीशी उभं आहे. नेपाळमधल्या या आपत्ती […]

संकटकाळात भारत नेपाळच्या पाठीशी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे आश्वस्त केलेय. नेपाळच्या महाप्रलयाचा बिहारला धोका, NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांचं एक्स वरचं ही पोस्ट आपण पाहतोय. या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळच्या पाठीशी उभं आहे. नेपाळमधल्या या आपत्ती संदर्भात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. संभाव्य बाधित सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांना एनडीआरएफ सह उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आलंय.

Published on: Aug 26, 2026 9:48 PM
Follow Us