अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु

अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु

| Updated on: Aug 14, 2026 | 10:49 AM

अमरावतीच्या आश्रमशाळेत वसतीगृहामध्ये चक्क विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं बोललं जातंय. कारण वसतीगृहाच्या खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींचा मुक्काम आहे. 48 विद्यार्थिनींची क्षमता आहे. मात्र खोलीमध्ये तब्बल 110 विद्यार्थिनी राहतायत. डोमा गावातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा पसरवली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी या वसतीगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा येथील आश्रमशाळेमध्ये […]

अमरावतीच्या आश्रमशाळेत वसतीगृहामध्ये चक्क विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं बोललं जातंय. कारण वसतीगृहाच्या खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनींचा मुक्काम आहे. 48 विद्यार्थिनींची क्षमता आहे. मात्र खोलीमध्ये तब्बल 110 विद्यार्थिनी राहतायत. डोमा गावातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा पसरवली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी या वसतीगृहात विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा येथील आश्रमशाळेमध्ये जर आपण पाहिलं तर मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरलेली होती आणि त्यानंतर आपण या माध्यमिक शाळेच्या आश्रमशाळेच्या वसतीगृहामध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकतो, सावित्रीबाई फुले कक्ष म्हणून या वसतीगृहाचं नाव आहे आणि याच वसतीगृहामध्ये त्या संपूर्ण विद्यार्थिनी राहत होत्या. तर या ठिकाणच्या सुरक्षेवर आणि विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेचा देखील प्रश्न या संपूर्ण प्रकरणानंतर समोर आलेला आहे. स्वप्नील उमाप, टीव्ही 9 मराठी, डोमा, मेळघाट.

Published on: Aug 14, 2026 10:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us