अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी
अमरावती जिल्ह्यातील हरभरा काढणीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. यंदा हरभरा काढणीला मोठ्या प्रमाणावर वेग आल्याने मेळघाट आणि मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांनी होळीचा सण साजरा करणे पुढे ढकलले आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी हे काम महत्त्वाचे असल्याने त्यांना आर्थिक गरजेमुळे गावी परतणे शक्य झालेले नाही.
अमरावती जिल्ह्यासह राज्यात सध्या होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, यावर्षी हरभरा काढणीला आलेल्या मोठ्या वेगळे आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक होळी सणावर पाणी सोडले आहे. आदिवासी समाजासाठी दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा मानला जाणारा होळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक मजूर गावी परतले नाहीत.
मेळघाट आणि मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील आदिवासी बांधव हरभरा काढणीच्या कामात व्यस्त आहेत. दरवर्षी होळीसाठी गावी परतणारे मजूर यंदा कामाच्या रगाड्यामुळे थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काम सोडून जाण्यासाठी सुट्टी मिळत नाहीये. वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर असल्याने त्यांना हे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. काही मजुरांनी होळीनंतर गावी जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांची यंदाची होळी कामाच्या ठिकाणीच साजरी होणार आहे.
Published on: Mar 03, 2026 01:30 PM
Follow Us