Kirit Somaiya UNCUT PC | साखर शब्दाला पर्याय म्हणजे पवार, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

| Updated on: Sep 23, 2021 | 8:20 PM

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी 3 बड्या नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Follow us on

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी 3 बड्या नेत्यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत राज्य सरकारमधील मंत्री सोमय्यांच्या टार्गेटवर असणार आहे. राज्यातील सरकार हे गुंड आणि माफियांचं आहे म्हणत, त्यांचे ठेकेकार हे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता अशा गैरव्यवहाराच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचा दावा सोमय्यांनी केला, ते अहमदनगरमध्ये बोलत होते. सोमय्या यांनी यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. सोमय्या म्हणाले की, साखर शब्दाला पर्याय म्हणजे पवार. जारंडेश्वर साखर कारखाना पवारांनी कसा विकत घेतला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, तो कारखाना अजित पवारांचा असल्याची चर्चा आहे.