दर अमावस्या आणि पौर्णिमेला अशोक खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा

दर अमावस्या आणि पौर्णिमेला अशोक खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा

| Updated on: Mar 22, 2026 | 11:29 AM

भोंदूबाबा विकास खरातच्या नावावर ४० एकरहून अधिक जमीन नाशिकच्या पाथर्डी शिवारात नोंदली गेली असल्याचे गावकऱ्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे.या अशोक खरात याने शेतकऱ्यांना धमकावून फशी पाडून चाळीस एकराहून अधिक जमीन नाशिक पाथर्डीत बळकावली असल्याचे उघडकीस आले आहे. भोंदूबाबा अमावस्या आणि पौर्णिमेला यायचा आणि गावकऱ्यांना फशी पाडून त्यांच्याकडून जमिनीचे व्यवहार करायचा. त्याच्याशिवाय इतर कोणाला तो जमिन विकूच द्यायचा नाही. कबूल केलेले पैसे तो कधी द्यायचा नाही अशी व्यथा गावकऱ्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मांडली आहे. त्याच्या सोबत एजंट असायचे आणि तो दबाव टाकून जमीन खरेदी करायचा असे म्हटले जात आहे. गावात एजंटाना विरोध झाल्यानंतर तो एकटाच येऊन व्यवहार करु लागला. ज्यांच्याकडे अडचणी आहेत त्यांना बरोबर हेरुन तो त्यांची जमीन विकत घ्यायचा असे गावकरी म्हणत आहेत.

Published on: Mar 22, 2026 11:28 AM
Follow Us