Deepak Kesarkar | अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया; खरातचं प्रकरण अतिशय घृणास्पद, कठोरात कठोर कारवाईची मागणी

Deepak Kesarkar | अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया; खरातचं प्रकरण अतिशय घृणास्पद, कठोरात कठोर कारवाईची मागणी

| Updated on: Mar 25, 2026 | 2:09 PM

खरातने केलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केसरकरांनी केली. तर खरात हा आपण अंकशास्त्रात जगातील सगळ्या अभ्यासकांपैकी एक आहे अशी प्रसिद्धी करायचा. त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, पण आता जे बाहेर येत आहे, त्यावरून तो सर्व खोटं बोलत होता, असंच म्हणावं लागेल. याप्रकरणाकडे राजकीय दृष्टीने बघता कामा नये असं देखील केसरकर म्हणाले.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर बनले आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण आणि जमिनी हडपल्याचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय, त्याच्याविरोधात काही अधिक गंभीर आरोप असून त्याचे पुरावे पोलीस यंत्रणांकडे आले आहेत. खरातचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. तसेच, त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान याप्रकरणी माध्यमांशी बोलताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातने केलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केसरकरांनी केली. तर खरात हा आपण अंकशास्त्रात जगातील सगळ्या अभ्यासकांपैकी एक आहे अशी प्रसिद्धी करायचा. त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, पण आता जे बाहेर येत आहे, त्यावरून तो सर्व खोटं बोलत होता, असंच म्हणावं लागेल. याप्रकरणाकडे राजकीय दृष्टीने बघता कामा नये असं देखील केसरकर म्हणाले.

Published on: Mar 25, 2026 02:09 PM
Follow Us