Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?

| Updated on: Mar 25, 2026 | 1:41 PM

भोंदूबाबा अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार आहे. त्याच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची चौकशी नाशिक पोलिस करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत निवेदन दिले.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडपणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे पोलीस यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तसेच, खरातचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार आहे. त्याच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची चौकशी नाशिक पोलिस करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत निवेदन दिले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन काही राजकीय नेत्यांचीही चौकशी होऊ शकते.

तसेच, स्वतःला “कॅप्टन” म्हणवणारा खरात 10 वी नापास आहे. अंकशास्त्र तज्ञ असलेला खरात हा गणितातच नापास होता. खरात दोन विषयांमध्ये नापास असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने १० वी च्या परीक्षेमध्ये केवळ 35.86% गुण मिळवले होते. शाळेच्या नोंदींनुसार त्याचे मूळ नाव लक्ष्मण एकनाथ खरात असून नंतर त्याने नाव बदलून अशोक कुमार केले असल्याचे समजते.

Published on: Mar 25, 2026 01:41 PM
Follow Us