मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क… नेमकं काय घडलं?

मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क… नेमकं काय घडलं?

| Updated on: May 09, 2026 | 10:40 AM

राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही काळापासून अशोक खरात प्रकरणात अनेक महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत.

राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही काळापासून अशोक खरात प्रकरणात अनेक महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत.

भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. भोंदू खरातवर आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. SIT अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. अलीकडील माहितीनुसार त्याची शिर्डी पोलिसांत जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी सुरु आहे. आधीही चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना अजब उत्तरं दिल्याचं सांगितलं जात होतं. आता मात्र त्याने कमालच केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, जमीन गैरव्यवहाराचे सर्व आरोप त्याने फेटाळले, त्यामध्ये त्याला फसवले जात आहे असंही तो म्हणाला, दरम्यान साक्ष म्हणून उपस्थित असलेल्या एका व्यक्तीवर तो चिडला, जवळपास चवताळलाच.

याआधीही त्याने ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए’ असा विचित्र जबाब नोंदवला होता. खरातने आत्तापर्यंत चौकशीदरम्यान कबूल केलं की त्याने चमत्कार करुन नाही तर हातचलाखीनं महिलांना धमकावलं आणि शोषण केलं. मात्र जमीन व्यवहाराबाबतचे सर्व आरोप अशोक खरातनं फेटाळले आहेत. या प्रकरणात पुढे नेमकं काय घडेल या कडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 09, 2026 10:40 AM
Follow Us