शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा

शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा

| Updated on: Aug 13, 2026 | 1:44 PM

धनुष्यबाण गोठवला जाईल, शिवसेनेला ठाकरेंना परत दिली जाईल असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीनंतर ॲडव्होकेट सरोदे यांनी हा मोठा दावा केलाय. महिन्याभरात शिवसेना पक्ष, चिन्हावर निकाल येईल असं वाटतं, असं सरोदे यांनी म्हटलेलं आहे. या महिन्याभरामध्ये पुढचा निकाल येईल असं मला नक्की वाटतंय आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे हे आता इतकं दबाव […]

धनुष्यबाण गोठवला जाईल, शिवसेनेला ठाकरेंना परत दिली जाईल असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीनंतर ॲडव्होकेट सरोदे यांनी हा मोठा दावा केलाय. महिन्याभरात शिवसेना पक्ष, चिन्हावर निकाल येईल असं वाटतं, असं सरोदे यांनी म्हटलेलं आहे. या महिन्याभरामध्ये पुढचा निकाल येईल असं मला नक्की वाटतंय आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे हे आता इतकं दबाव किंवा प्रेशर आलेला आहे म्हणजे नैतिकतेचा एक दबाव आलेला आहे सुप्रीम कोर्टावर की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरेंचा विजय. सत्याचा विजय म्हणजेच मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय. त्यामुळे हे सिम्बॉल हे जे आहे, धनुष्यबाण हे सिम्बॉल, हे आता गोठवून टाकण्यात येईल. म्हणजे एकनाथ शिंदे पण वापरणार नाही कदाचित, उद्धव ठाकरे पण वापरणार नाही. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल आणि मग एकनाथ शिंदे कुठेतरी नवीन सिम्बॉल घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये समाविष्ट होईल.

Published on: Aug 13, 2026 1:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us