Kannad Ghat | कन्नड-चाळीसगावमधील घाटात दरड कोसळली, घाटाची ड्रोन दृश्यं

| Updated on: Aug 31, 2021 | 5:04 PM

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने ठप्प झाली आहे. यामुळे अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत.

Follow us on

औरंगाबाद धुळे रोडवर रात्री मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली या दरडीखाली म्हशी घेऊन जाणारा ट्रकवर ही दरड कोसळली या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून या घटनेत अनेक म्हशीना आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर आशा दरड कोसळल्याने रास्ता संपूर्णपणे बंद झालेला आहे. सध्या पाऊस थांबला असल्याने रास्ता कसा सुरू करता येईल असा प्रयत्न होत असला तरी पुन्हा पाऊस झाल्यास स्थिती बिकट होऊ शकते.चा

चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.