लाव रे तो व्हिडीओ… अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!

लाव रे तो व्हिडीओ… अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!

| Updated on: Jul 19, 2026 | 11:03 AM

अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. या आंदोलनाला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांचा एक व्हिडीओ ऐकवला. त्यानंतर त्यांनी राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणावर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिर कोणाच्या मालकीचे नाही. आम्हीही रामभक्त आहोत. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी एकही शंकराचार्य उपस्थित नव्हता. त्या वेळी आम्ही काळाराम मंदिरात होतो.”

ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता. “राम तुझाच नाही, माझाही आहे,” हा संदेश त्यांनी दिला होता. आम्ही “जय शिवराय, जय श्रीराम” म्हणतो आणि आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरातील कथित चोरी हा केवळ दानपेटीवरील प्रकार नसून हिंदूंच्या श्रद्धेवर घातलेला आघात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या प्रकरणात प्रत्येक हिंदूने न्यायाधीश बनून योग्य निर्णय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Jul 18, 2026 5:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us