मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच… हादरवणारी माहिती समोर
बारामती येथे रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्यापही गूढ कायम आहे. रुई येथील साई गणेश नगरमध्ये फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे. आमदार रोहित पवारही लवकरच बारामतीला भेट देणार आहेत.
बारामती शहरात रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्यापही मोठे गूढ कायम असून, प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेता, या प्रकरणी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. काही चर्चांनुसार तीचा आईशी वाद झाला अन् ती रात्रीपासून बेपत्ता झाल्याचं सांगितलं जात आहे. तीचं वय अवघं १२ वर्षे असल्याचंही सांगितलं जात आहे.
बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली आहे. फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली जात आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील सत्य लवकरच समोर येऊ शकेल. या प्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच, आमदार रोहित पवार हे स्वतः देखील थोड्याच वेळात बारामतीमध्ये येणार आहेत. ते पीडित कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता आहे. या घटनेने परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलीस यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.
