tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत

tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत

| Updated on: Apr 11, 2026 | 10:23 AM

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा तब्बल 22 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला येत्या रविवारी अधिकृत सुरुवात होणार असून कन्हेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवार न दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना सुळेंनी “रिश्ते मायने रखते है” असे सूचक विधान केले. तसेच “पक्षाने ठरवू द्या” असे म्हणत त्यांनी प्रचारात सहभागी होण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
तसेच बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पोस्टर्सवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यापूर्वी अर्ज भरण्याच्या दिवशीही दादांच्या गटाच्या मेळाव्यात शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. मात्र, याबाबत नाराजी व्यक्त करत शरद पवार यांनी आपला फोटो वापरू नये, अशी सूचना संबंधित नेत्यांना दिल्या होत्या.
एकूणच, बारामती पोटनिवडणूक केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांमुळे अधिकच चर्चेत आली आहे.

Published on: Apr 11, 2026 10:23 AM
Follow Us