Satish Bhosle Video : ‘खोक्या’ मालामाल कसा? कारनामे एकदा बघाच, सतीश भोसलेच्या तिसऱ्या व्हिडीओनं खळबळ

Satish Bhosle Video : ‘खोक्या’ मालामाल कसा? कारनामे एकदा बघाच, सतीश भोसलेच्या तिसऱ्या व्हिडीओनं खळबळ

| Updated on: Mar 07, 2025 | 10:37 PM

सतीश भोसले उर्फ खोक्याचा पैसे उधळतानाचा तिसरा व्हिडिओ समोर आला असून खोक्याच्या तिसऱ्या व्हिडिओने एकूणच खळबळ माजवली. त्याच्याकडे एवढा माल कसा? असा प्रश्न उपस्थित होतोय. खोक्या भोसलेकडून कैलास वाघला दीड वर्षांपूर्वी बॅटने मारहाण झाली होती. खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. या व्हिडीओनंतर धसांच्या खोक्या भोसलेकडे कुणाचे पैसे? धसाच्या खोक्या भोसले […]

सतीश भोसले उर्फ खोक्याचा पैसे उधळतानाचा तिसरा व्हिडिओ समोर आला असून खोक्याच्या तिसऱ्या व्हिडिओने एकूणच खळबळ माजवली. त्याच्याकडे एवढा माल कसा? असा प्रश्न उपस्थित होतोय. खोक्या भोसलेकडून कैलास वाघला दीड वर्षांपूर्वी बॅटने मारहाण झाली होती. खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. या व्हिडीओनंतर धसांच्या खोक्या भोसलेकडे कुणाचे पैसे? धसाच्या खोक्या भोसले मालामाल कसा? तिसऱ्या व्हिडिओत खोक्याकडे मालामाल. हा कुणाचा माल? खोक्या बंडल फेकतोय, पैसे उधळतोय, बीडमध्ये हे चाललंय काय? खोक्या भोसलेच्या तिसऱ्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अंजली दमानियांनी व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर खोक्या भोसले चर्चेत आला. खोक्या भोसलेकडे एवढा प्रचंड पैसा कुणाचा यावरून बीडमध्ये तुफान चर्चा सुरू आहे. खोक्या भोसलेला हरिणांचं मटण खान्याची सवय असून त्याने प्राण्याची शिकार केल्याचे आढळून आले आहे. या व्हिडीओनंतर तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या?

Published on: Mar 07, 2025 10:36 PM