… अन् पोलीस येताच नवरदेवाने ठोकली धूम! बीडमधला व्हिडीओ व्हायरल

… अन् पोलीस येताच नवरदेवाने ठोकली धूम! बीडमधला व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 07, 2026 | 10:21 AM

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेव राजेंद्र शिंदे पोलिसांच्या धाडीनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी मंगल कार्यालयात पोहचताच नवरदेवाने पळ काढला. या प्रकरणी नवरदेवासह त्याचे आई-वडील, वधूचे आई-वडील आणि मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक अशा एकूण साठ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नवरदेवाचा मामा पोलिसांच्या ताब्यात आहे.

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याप्रकरणी नवरदेव राजेंद्र शिंदे फरार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नसमारंभ सुरू असतानाच पोलिसांनी कपिलधार येथील मंगल कार्यालयात छापा टाकला. पोलीस दाखल झाल्याचे समजताच नवरदेव राजेंद्र शिंदेने बुलेटवरून पळ काढला. त्याचा पळून जातानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वधू सोळा वर्षांची असून तिने दहावी पास केली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार हा विवाह बेकायदेशीर ठरतो.

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत नवरदेव राजेंद्र शिंदे, त्याचे आई-वडील आणि अल्पवयीन वधूचे आई-वडील यांच्यासह एकूण साठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विवाह ज्या ठिकाणी संपन्न झाला त्या मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक आणि उपस्थित मंडळींवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवासह त्याचे आई-वडीलही फरार असून पोलिसांनी राजेंद्र शिंदेच्या मामाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बालविवाहाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.

Published on: Feb 07, 2026 10:21 AM