जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्…; काय आहे 90 वर्षांची परंपरा?

| Updated on: Mar 03, 2026 | 1:16 PM

बीड जिल्ह्यातील विडा गावात होळीच्या निमित्ताने गेल्या ९० वर्षांपासून जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. निजामकालीन आनंदरावजी ठाकूर यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही उत्साहात पाळली जाते. यंदाही अनेक जावई लपून बसले असताना, एका ज्येष्ठ जावयाला प्रेमाने सहभागी करून ही अनोखी गदर्भ सवारी काढण्यात आली.

बीड जिल्ह्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या निमित्ताने गेल्या ९० वर्षांपासून एक आगळीवेगळी परंपरा जोपासली जात आहे. होळीच्या दिवशी गावात एका जावयाला गाढवावरून मिरवले जाते. निजामकालीन आनंदरावजी ठाकूर यांनी चेष्टामस्करीमध्ये आपल्या जावयाला मिरवल्यापासून ही प्रथा अखंडितपणे सुरू आहे.

गेल्या वर्षी एका दुर्दैवी घटनेमुळे ही प्रथा थांबवण्यात आली होती, मात्र यंदा गावकऱ्यांनी ती पुन्हा उत्साहात साजरी केली. ही मिरवणूक काढण्यासाठी जावई मिळवणे हे मोठे आव्हान असते, कारण आठ दिवस आधीपासूनच अनेक जावई गायब होतात. यावर्षी, गावकऱ्यांनी साठ-सत्तर वर्षांच्या एका ज्येष्ठ जावयाला प्रेमाने विनंती करून या परंपरेत सहभागी करून घेतले. संपूर्ण गावात डॉल्बी, डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात ही गदर्भ सवारी काढण्यात आली. मिरवणुकीनंतर जावयाला कपड्यांचा आहेर देऊन सन्मानित केले जाते, जी या प्रथेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Published on: Mar 03, 2026 01:16 PM
Follow Us