बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच…समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
बीड शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरात झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. समाधान खिंडकर हा आपल्या वैयक्तिक कामासाठी पंचायत समिती कार्यालयात आला होता. यावेळी त्याचा भाऊ दादा खिंडकर आणि त्याच्या एका साथीदाराने जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामपंचायतीच्या कामात ढवळाढवळ का करतोस, अशी विचारणा करत दोघांनी समाधान खिंडकरला लोखंडी पाईप, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे. ही घटना काल घडली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दादा खिंडकर आणि अन्य एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दादा खिंडकर लोखंडी पाईपने मारहाण करताना दिसत आहे. घटनेनंतर केलेल्या फेसबुक पोस्टमुळेही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.