
‘या’ गावची अनोखी प्रथा, धुलिवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक, बघा व्हिडीओ
VIDEO | होळीनिमित्त जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा, कुठं आहे ही प्रथा
बीड : जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात आहे. रंगपंचमी निमित्त जावई शोधून आणतात. यंदा हा मान केज तालुक्यातील जवळबन येथील जावयाला मिळाला आहे. मागच्या 91 वर्षांपासून रंगपंचमीला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अविनाश करपे या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. करपे यांना तरुणांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. आज त्यांना गाढवावर बसवून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. थट्टा मस्करीत सुरू झालेली ही प्रथा आता या गावची संस्कृती बनली आहे. तशी या गावात घरं आणि जावयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याच विडा गावात ही अनोखी परंपरा दरवर्षी साजरी केली जाते.
Published on: Mar 07, 2023 3:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! तिकीट दरात सूट हवी असेल तर 1 ऑक्टोबर...
राज्यातील SIR मोहिमेबाबत मोठा निर्णय, बीएलओ थेट मतदारांच्या घरी धडकणार
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
LPG Cylinder संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर, जर असं केलात तर थेट सरकार
खरंच नीता अंबानी हँडशेक करणं टाळतात? ज्योतिषशास्त्राचं कारण
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...