Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहन रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्यानंतर पलटी झाल्याने वाहनातील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनाचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन प्रथम रस्त्यावरील दुभाजकावर आदळले. धडकेचा जोर इतका होता की, वाहन थेट रस्त्यावर पलटी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.