Bharat Gogawale : ओम फट् स्वाहा… ते आले, त्यांना पाहिलं अन् विरोधकांनी गोगावलेंना डिवचलं, बघा VIDEO हसू अवरणार नाही

Bharat Gogawale : ओम फट् स्वाहा… ते आले, त्यांना पाहिलं अन् विरोधकांनी गोगावलेंना डिवचलं, बघा VIDEO हसू अवरणार नाही

| Updated on: Jul 08, 2025 | 6:32 PM

आज विधानभवनात विरोधकांकडून मिश्कील घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी करण्यात आली. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक बसलेले असताना त्यांनी भरत गोगावले येताच त्यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले.

सध्या राज्याचं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री यांना चांगलंच डिवचल्याचं दिसून आलं. ओम फट् स्वाहा.. असं म्हणत विरोधकांनी भरत गोगावले यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. सर्व विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर काहीतरी बोलत होते. यावेळी ठाकरे गटातील नेते नितीन देशमुख यांनी भरत गोगावले यांना पाहिलं आणि बघताच क्षणी ओम फट् स्वाहा.. अशी घोषणाबाजी केली. यानंतर सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

Published on: Jul 08, 2025 05:23 PM