जयंत पाटील म्हणाले…. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना.. ठाकरे गटाच्या नेत्याने मान्यही केलं, पोटातलं ओठावर आलं?  पाहा Video!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

जयंत पाटील म्हणाले.... आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना.. ठाकरे गटाच्या नेत्याने मान्यही केलं, पोटातलं ओठावर आलं?  पाहा Video!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 11:31 AM

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना (Shivsena) गहाण ठेवली आहे, असा आरोप वारंवार केला जातो. ठाकरे गटाचे नेते हे आरोप फेटाळून लावत असतात. पण पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने हे मान्य केलंय. हसत हसत मान्य केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना  या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाक्यावर या नेत्याने सहमती दर्शवली आहे.  हे मान्य करणारे नेते आहेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav). नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या काही सेकंद आधीचा हा व्हिडिओ आहे.

माध्यमांचे माइक लागत होते. पत्रकार परिषदेसाठी तयारी सुरु होती. यावेळी जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यादरम्यान झालेल्या संवादाचा हा व्हिडिओ आहे.

पत्रकार परिषदेत मध्यभागी अजित पवार, त्यांच्या बाजूला डाव्या बाजूने भास्कर जाधव आणि त्यानंतर जयंत पाटील दिसत आहेत. अजित पवारांचं बोलणं सुरु होण्याआधी जयंत पाटील भास्कर जाधवांना म्हणतात

आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात.

मनसे नेत्यांनी हा व्हिडिओ हेरला.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना, आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना.. पोटातलं ओठावर आलंच, असं म्हणत भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यावर काय प्रतिक्रिया देतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.