Trupati Desai | ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबा खरातकडून अत्याचार… त्याच ठिकाणी तृप्ती देसाईंची धडक
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात आणखी तीन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा, तसेच लग्न, धार्मिक विधी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व लिंग समानता कार्यकर्त्या तृप्ती देसाई आज मिरगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी मिरगावमधील भोंदूबाबाचा फार्महाऊस आणि शिवनिका संस्थान ईशानेश्वर मंदिर येथे भेट देणार असल्याचे सांगितले. तिथे भुयारी खोली असून, त्या खोलीत भोंदूबाबा महिलांचा लैंगिक शोषण करत असल्याचे तृप्ती देसाईंनी आरोप केले. तसेच, भोंदूबाबा टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.