Mumbai | BJP | मुंबईत भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री….अमित साटम यांचा इशारा

Mumbai | BJP | मुंबईत भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री….अमित साटम यांचा इशारा

| Updated on: May 07, 2026 | 1:23 PM

मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांसाठी पक्षाकडून आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षशिस्त आणि कामगिरीच्या आधारेच यापुढे नगरसेवकांना निधी वाटप करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. सभागृहातील उपस्थिती, पक्षाशी समन्वय आणि स्थानिक पातळीवरील कामगिरी यांचा आढावा घेऊनच निधी मंजूर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या जुन्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नगरसेवकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. पक्षाच्या निर्णयांचे पालन न करणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, पक्षशिस्त न पाळणाऱ्या नगरसेवकांच्या निधीवरही गंडांतर येऊ शकते, असे संकेत बैठकीत देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मुंबई भाजपमध्ये शिस्त आणि कार्यपद्धतीबाबत अधिक कडक भूमिका पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 07, 2026 12:40 PM
Follow Us