स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

| Updated on: May 17, 2022 | 8:41 AM

पुण्यामध्ये भाजपा नेत्या स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये वाद झाला होता. या प्रकरणात आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये भाजपा नेत्या स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Published on: May 17, 2022 8:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us