मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा ‘कॉक्रोच’बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी त्यांच्या एका कथित टिप्पणीवरून सुरू असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी त्यांच्या एका कथित टिप्पणीवरून सुरू असलेल्या वादावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला, असे सूर्यकांत यांनी म्हटले आहे. विशेषतः कॉक्रोच संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून निर्माण झालेल्या गैरसमजांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सूर्यकांत यांनी म्हटले आहे की, मी बोललो नाही ते माझं वक्तव्य असल्याचं सांगितलं गेलं. त्यांच्या नावावर जी काही वक्तव्ये सध्या चर्चिली जात आहेत, ती त्यांनी प्रत्यक्षात केलीच नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात तरुणांना जाणूनबुजून भ्रमित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोपही सीजेआय सूर्यकांत यांनी केला आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या कथित वक्तव्यावरून विविध स्तरांवर सुरू असलेली चर्चा आणि टीका यांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. न्यायव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या व्यक्तीने आपल्या टिप्पणीचा गैरवापर झाल्याचा आरोप करणे, हे निश्चितच गंभीर मानले जात आहे.
या स्पष्टीकरणामुळे कथित कॉक्रोच टिप्पणीवरील गैरसमज दूर होतील आणि तरुणांमध्ये निर्माण झालेला संभ्रम कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीजेआय सूर्यकांत यांनी या प्रकरणात त्वरित आणि थेट स्पष्टीकरण देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे
