जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

| Updated on: Oct 11, 2026 | 1:37 PM

जामिनावरील सुटकेनंतर अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. या भेटीत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या भेटीत तिघांनीही कपिल सिब्बल यांच्यासोबत कायदेशीर रणनीतीवर चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, टीव्ही९ मराठीशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर दुपारी सीजेपीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती सौरभ दास यांनी जामिनावर सुटल्यानंतर तात्काळ सिब्बल यांच्या भेटीसाठी जाण्यामागे भविष्यातील कायदेशीर आणि राजकीय भूमिकेबाबत चर्चा करणे हा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.  या भेटीमध्ये सिब्बल यांनी दिवाळीपर्यंत काही करू नका असा सल्ला दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

Published on: Oct 11, 2026 12:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us