मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या ‘त्या’ टीकेवर जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर; शेपूट तुमच्याकडेच…

मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या ‘त्या’ टीकेवर जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर; शेपूट तुमच्याकडेच…

Harshada Shinkar | Updated on: Feb 23, 2024 | 5:14 PM

मनोज जरांगे पाटील म्हणजे मारूतीचं न संपणारं शेपूट आहे, तर जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढली आहे असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना काल खोचक टोला लगावला होता. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या या टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे.

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील म्हणजे मारूतीचं न संपणारं शेपूट आहे, तर जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढली आहे असे म्हणत भुजबळांनी जरांगेंना काल खोचक टोला लगावला होता. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या या टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केला आहे. मारूतीच्या शेपटीवरूनच मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आता जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. ‘छगन भुजबळ म्हणजे ओबीसी समाजाला लागलेला डाग आहे. तर मारूतीचं शेपूट तुमच्याकडेच येणार आहे’, असे म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांना फटकारलं आहे. तर मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण दिलं मग आता आरक्षणाची गरज काय? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी थेट केला तर आम्हाला आंदोलनाचं कारण विचारणारा छगन भुजबळ कोण? असा प्रतिप्रश्न करत जरांगेंनी एकेरी उल्लेख करत भुजबळांवर टीका केली.

Published on: Feb 23, 2024 5:14 PM
Follow Us