विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन

| Updated on: Aug 02, 2026 | 6:00 PM

नागपूरमध्ये सत्यनारायण नुवाल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत AI लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील रोजगाराबाबत महत्त्वाचे विचार मांडले.

नागपूरमध्ये सत्यनारायण नुवाल आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत AI लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील रोजगाराबाबत महत्त्वाचे विचार मांडले.

फडणवीस म्हणाले की, या अत्याधुनिक AI लॅबची स्थापना ही आनंदाची बाब आहे. रामदेवबाबा विद्यापीठाने संशोधनाला प्राधान्य देत शिक्षणाला नवा आकार दिला आहे. AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंग ही तंत्रज्ञाने भविष्यात मोठे बदल घडवतील, असे त्यांनी सांगितले.

आज डीपफेक, AI आणि सहाव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा सुरू असून तंत्रज्ञानातील बदलाचा वेग वाढला आहे. रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीसह सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे परिवर्तन होत आहे. पुढील एक हजार दिवसांत 75 टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल; नोकऱ्या जाणार नाहीत, त्यांचे रूप बदलेल, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या महाविस्तार AI App चा उल्लेख करत त्यांनी कृषी क्षेत्रातील उपयोगही सांगितला. AI मुळे शेतीचा खर्च 25 टक्क्यांनी कमी आणि उत्पादन 30 टक्क्यांनी वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. रामदेवबाबा विद्यापीठ 90 स्टार्टअप्सना मदत करत असून, मध्य भारतातील पुढचे इनोवेशन याच संस्थेतून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 02, 2026 6:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us