CNG Rate Update | पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, तर सीएनजी किती रूपयांनी महागले?

CNG Rate Update | पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, तर सीएनजी किती रूपयांनी महागले?

| Updated on: May 09, 2026 | 10:00 AM

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे पर्याय म्हणून सीएनजीकडे वळलेल्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसत आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ₹1.50 ने वाढ करण्यात आली आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे पर्याय म्हणून सीएनजीकडे वळलेल्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसत आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ₹1.50 ने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कालपर्यंत एका किलो सीएनजीसाठी ₹93.65 मोजणाऱ्या ग्राहकांना आता ₹95.15 इतकी रक्कम भरावी लागत आहे.
दरम्यान, सीएनजीसाठी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अशातच दरवाढ झाल्यामुळे “सीएनजी हा स्वस्त इंधनाचा पर्याय राहिलेला नाही,” अशी भावना अनेक ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी खर्चिक म्हणून सीएनजी वाहनांना पसंती मिळत होती. मात्र सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे आता वाहनचालकांचे मासिक आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

 

Published on: May 09, 2026 10:00 AM
Follow Us