Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली… अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
सोशल मीडियावर सध्या कॉमेडियन प्रणीत मोरे याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो सार्वजनिकरित्या माफी मागताना दिसत आहे. एका स्टँडअप शोदरम्यान झालेल्या वादग्रस्त ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ जोकनंतर निर्माण झालेल्या वादामुळे प्रणीत मोरे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर सध्या कॉमेडियन प्रणीत मोरे याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो सार्वजनिकरित्या माफी मागताना दिसत आहे. एका स्टँडअप शोदरम्यान झालेल्या वादग्रस्त ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ जोकनंतर निर्माण झालेल्या वादामुळे प्रणीत मोरे चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका शोदरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. या प्रसंगात प्रणीत मोरे आणि उपस्थित प्रेक्षक हसल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर प्रणीत मोरेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे.
व्हिडिओमध्ये प्रणीत मोरे म्हणाला की, गेल्या काही दिवसांपासून तो याबाबत भूमिका मांडू इच्छित होता, मात्र त्याचे सोशल मीडिया अकाउंट निलंबित झाल्याने तो बोलू शकला नव्हता. संबंधित घटनेत आपण योग्य निर्णय घेऊ शकलो नाही, ही आपली मोठी चूक असल्याचे त्याने मान्य केले.
“त्या प्रसंगी मला संबंधित व्यक्तीला थांबवून योग्य भूमिका घ्यायला हवी होती. मात्र मी तसे केले नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी मनापासून माफी मागतो,” असे तो म्हणाला.
तसेच, आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईत आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगत त्याने प्रेक्षकांकडे आणखी एक संधी देण्याची विनंती केली. भविष्यात स्वतःमध्ये आणि आपल्या कंटेंटमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही प्रणीत मोरेने दिले.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, प्रणीत मोरेच्या या माफीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
