tv9 Marathi Special Report | घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम

tv9 Marathi Special Report | घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम

| Updated on: Mar 13, 2026 | 11:12 AM

घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने राज्यातील हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने राज्यातील हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हॉटेल्स हळूहळू बंद पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल व्यावसायिक गॅस संपल्यामुळे तात्पुरते बंद ठेवावे लागले आहे. हॉटेलच्या बाहेर याबाबत सूचना देणारा फलक लावण्यात आला आहे. तसेच सोलापूरमध्येही अनेक छोट्या व्यावसायिकांनी गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे आपली हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे रोजच्या व्यवसायावर परिणाम होत असून व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या उद्योगांमध्ये गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जातो, त्या कंपन्यांमध्ये सध्या गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र ज्या उद्योगांना गॅस सिलेंडरवर अवलंबून राहावे लागते, त्या MIDC मधील अनेक कंपन्यांना उत्पादन थांबवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. गॅस पुरवठ्याच्या या परिस्थितीमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय, लघुउद्योग आणि औद्योगिक क्षेत्र मोठ्या संकटात सापडले असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 13, 2026 11:11 AM
Follow Us