
Jayashree Patil : सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
Sangali News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपचा हा मोठा धक्का म्हणावं लागणार आहे. वसंतदादा पाटील यांच्या त्या नातसून आहेत.
सांगलीच्या राजकारणात भाजपला बळ मिळाले असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दादा घराण्यातून मोठा गट गळाला लागला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे.
Published on: Jun 17, 2025 6:22 PM
Related Video
हालचालींना वेग... ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ शिंदेही दिल्लीला रवाना...
Video: मारो, मारो, मारो… अरबाझ खान याच्या संरक्षणात मोठी गफलत..
Gold : आत्ताच दागिने खरेदी करा, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजा दर
बुधवारी डबल धमाका, भारत-अफगाणिस्तानमध्ये 2 सामने, चाहत्यांसाठी पर्वणी
नवी गाडी, नवा बंगला, तीन राशींच्या आयुष्यात आजचा दिवस ठरणार खास!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार