संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आता राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदारांनी बैठक बोलवली आहे.
आज संध्याकळी 6 च्यासुमारास ही बैठक पार पडणार असून या बैठकीत राहुल गांधी यांच्यासह काही पदाधिकारी तसेच सर्व खासदार उपस्थित राहणार अशी माहिती मिळत आहे. आता या बैठकीत नेमकं काय ठऱणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधी सातत्याने प्रश्न विचारत आहते तसेच आवाज उठवत आहेत. या बैठकीत त्यांचा पक्ष कोणती रणनीती ठरवेल का? याकडेही देशभराचं लक्ष लागलं आहे.
