Sanjay Raut On Jain Muni | ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; संजय राऊतांचा जैन मुनींवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Sanjay Raut On Jain Muni | ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; संजय राऊतांचा जैन मुनींवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा

| Updated on: Apr 01, 2026 | 11:15 AM

महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय नेत्यांसह अनेक स्तरांतून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जैन मुनींच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली. “या जैन मुनींना असे वक्तव्य का करावेसे वाटले? कदाचित त्यांच्या परंपरेत शूरवीर किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे,”

महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय नेत्यांसह अनेक स्तरांतून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जैन मुनींच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली. “या जैन मुनींना असे वक्तव्य का करावेसे वाटले? कदाचित त्यांच्या परंपरेत शूरवीर किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे,” असा टोला राऊत यांनी लगावला. राऊत पुढे म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती होते. “मग हंबीरराव मोहिते जैन होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ताराराणी यांचा जन्म हिंदू मराठा कुळात झाला असून त्यांनी शस्त्रधर्म पाळत राज्य आणि धर्मरक्षणासाठी तलवार हाती घेतली, असेही राऊत यांनी अधोरेखित केले. दरम्यान, राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही टीका करताना राऊत म्हणाले की, “सध्याच्या फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजवटीत महाराष्ट्राचे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: Apr 01, 2026 11:15 AM
Follow Us