CM Eknath Shinde | हिंदु सण उत्साहात, जल्लोषात साजरे झाले पाहिजेत – tv9
राज्यातील आमचं सरकार हे धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित आहे. त्यामुळे हिंदूंचे सर्व सण हे उत्साहात आणि जल्लोषात साजरे झाले पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
दहीहंडी जोमात आणि जल्लोषात राज्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व तरून वर्ग या निमित्ताने रस्त्यावर उतरला आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकंट गेलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य काळजी घ्यावी अशी सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केली आहे. त्याचबरोबर राज्यातील आमचं सरकार हे धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित आहे. त्यामुळे हिंदूंचे सर्व सण हे उत्साहात आणि जल्लोषात साजरे झाले पाहिजे असेही ते म्हणाले. तर जे गोविंदा या दहीहंडीत भाग घेत आहेत त्या पथकाने काळजी घेऊन थर लावावे, कुठेही अपघात होऊ नये याची प्रथम काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 19, 2022 5:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
