Ajit Pawar :  नीट सांगतोय…अरे खुर्च्या द्या ना… सभेच्या व्यासपीठावर अजितदादा संतापले, जालन्यात स्टेजवर नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : नीट सांगतोय…अरे खुर्च्या द्या ना… सभेच्या व्यासपीठावर अजितदादा संतापले, जालन्यात स्टेजवर नेमकं काय घडलं?

Harshada Shinkar | Updated on: Nov 22, 2025 | 5:58 PM

जालन्यात एका सभेदरम्यान उमेदवारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. व्यासपीठावरच त्यांनी पोलिसांना आणि कार्यकर्त्यांना याबाबत ताकीद दिली, तसेच तात्काळ खुर्च्या लावण्याचे निर्देश दिले.

जालन्यात आयोजित एका सभेदरम्यान उमेदवारांसाठी खुर्च्यांची योग्य व्यवस्था नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी यावेळी व्यासपीठावरच तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी उपस्थित पोलीस आणि कार्यकर्त्यांना तात्काळ उमेदवारांसाठी खुर्च्या लावण्याची सक्त ताकीद दिली. या घटनेमुळे सभेमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांची प्रचारसभा नियोजित आहे. या सभेत गोंधळ घालण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून अजित पवारांच्या सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत अपेक्षित आहे.

Published on: Nov 22, 2025 5:58 PM
Follow Us