खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..

खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..

| Updated on: Jun 26, 2026 | 7:38 PM

महाराष्ट्राभर गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवलं होतं. त्याचे कांड सुन्न करणार होते. या प्रकरणावर चित्रपट येणार अशी घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्राभर गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवलं होतं. त्याचे कांड सुन्न करणार होते. या प्रकरणावर चित्रपट येणार अशी घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स. या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपाली सैय्यद भोसले या चित्रपटात रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासाठी त्यांनी रूपाली चाकणकर यांचे व्हिडिओ, फोटो, साडीची स्टाईल आणि हेअरस्टाईल बारकाईने पाहिल्याचे सांगितले. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांच्यासारख्या चर्चित व्यक्तींवर आधारित पात्र दाखवण्यात येणार आहेत. अशोक खरात यांच्यासारख्या भोंदू बाबांपासून लोकांनी सावध राहावे, हा चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे दीपाली सैय्यद यांनी म्हटले आहे.

राजकारणातील फुटाफुटीवरही त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी दौरे लवकर सुरू केले असते तर अनेक नेते पक्ष सोडून गेले नसते, असे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांनीही आता थांबण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक अधिक जागरूक होतील, असा दावा त्यांनी केला.

Published on: Jun 26, 2026 7:38 PM
Follow Us