Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा…

Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा…

| Updated on: Jul 23, 2026 | 3:15 PM

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा सुरू आहे. संसदेतही या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी पळपुटेपाणा सोडवा. त्यानंतर संसदेत चर्चा करावी. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर होत नाहीत, तर संसदेत होतात. देशाच्या संविधानावर विश्वास असेल, तर संसदेत चर्चा करावी. उत्तर पाहिजे असतील, तर संसदेत मागा. तुमच्याकडे संकल्पना असेल, तर सरकारला ती करण्यासाठी मजबूर करा. आंदोलनाच्या भरवशावर राजकीय पोळी भाजने बंद करावे. विद्यार्थी हिताच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायचे असतील, तर ते चर्चेच्या माध्यमातून होतील’.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर विरोधक काय भूमिका घेणार आणि संसदेत या मुद्द्यावर पुढे काय घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 23, 2026 3:15 PM
Follow Us