पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा सध्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असून, फडणवीसही तिथेच आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुण्यातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून, शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतल्याने, या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील घडामोडी आणि आगामी रणनीती यावर या भेटीत मंथन होण्याची शक्यता आहे. या उच्चस्तरीय भेटीतून कोणते महत्त्वाचे निर्णय समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
