मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका

मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका

| Updated on: Aug 03, 2026 | 2:07 PM

राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. जनतेच्या पैशाचा वापर केवळ विकासकामांसाठी व्हावा, अनावश्यक खर्च टाळावा आणि प्रशासनाने लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित प्रस्ताव सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडला होता. मात्र, या प्रस्तावावर विरोधकांसह विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर त्यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली. वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी जनतेचा पैसा अनावश्यक खर्चावर न करता विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या हिताच्या योजनांवर खर्च करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट मत व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रशासनाने खर्चात काटकसर करत लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, असा संदेशही त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, इनोव्हा गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या वादानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा रंगली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेकडेही विशेष लक्ष वेधले जात आहे.

Published on: Aug 03, 2026 2:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us