संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी दैनिक सामनातून अग्रलेख लिहिला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं होतं. अमित शाह यांच्या हातात सूत्रे गेल्यास ते पहिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पत्ता कट करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका. ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत. तिथे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी उपचार घ्यावा, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी चढवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

