CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
ऐन दिवाळीच्या सणात धुळे शहरातील वाहनधारकांना सीएनजी दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. प्रति किलो एक रुपयाने दर वाढले असून, गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि मुंबई येथून आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऐन दिवाळीच्या सणात धुळे शहरातील वाहनधारकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजी गॅसच्या दरामध्ये प्रति किलो एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
एकीकडे दरवाढ असताना, दुसरीकडे पुरेसा गॅस पुरवठा होत नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. धुळे शहरातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. विशेषतः अवधान एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
शहरात एकूण तीन सीएनजी गॅस पंप असले तरी, सद्यस्थितीत या तिन्ही पंपांवर सीएनजी गॅस उपलब्ध नसल्याची माहिती आहे. यामुळे अनेक वाहने थांबून आहेत आणि चालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवाळीनिमित्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई येथून आपल्या गावी आलेल्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना या गॅस टंचाईमुळे आणि दरवाढीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी मनेश महासवे यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे.
