Petrol Price Hike | डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक थेट बॅरल घेऊन…

Petrol Price Hike | डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक थेट बॅरल घेऊन…

| Updated on: May 03, 2026 | 12:48 PM

राज्यात इंधन पुरवठ्याबाबत तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंगोली आणि बीड जिल्ह्यात डिझेल तुटवड्याची तीव्रता वाढली आहे. इंधन पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण असतानाच हिंगोली आणि बीड जिल्ह्यात डिझेल तुटवड्याने नागरिक हैराण झाले.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर येथील पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याच्या अफवेने वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. अनेकजण बॅरल आणि कॅन घेऊन डिझेल साठवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतीची कामे आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुरवठा विभागाने इंधन कंपन्यांशी संपर्क साधल्यानंतर सुमारे 10 लाख लिटर डिझेल पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली.

आज काही पंपांवर डिझेल उपलब्ध होताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन साठवत आहेत. परिणामी साठा संपून तुटवडा वाढल्याचे पंप चालकांनी सांगितले.

Published on: May 03, 2026 12:48 PM
Follow Us