महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

| Updated on: Aug 04, 2026 | 11:59 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले.

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. ते 90 वर्षांचे होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रासह विविध ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

राजकारणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ज्येष्ठ राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

Published on: Aug 04, 2026 11:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us