Eknath Khadse : पंकजाताईंची काळजी भाजपाचे सर्वच नेते करायला लागलेत, मंत्रीपदावरून एकनाथ खडसेंचा टोला

Eknath Khadse : पंकजाताईंची काळजी भाजपाचे सर्वच नेते करायला लागलेत, मंत्रीपदावरून एकनाथ खडसेंचा टोला

| Updated on: Aug 12, 2022 | 5:22 PM

पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.

जळगाव : पंकजाताईंची काळजी भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते करायला लागले आहेत. गिरीश महाजनांपासून (Girish Mahajan) तर भाजपाचे सर्वच नेते पंकजाताईंची काळजी घेत असून त्यांना सल्ला देत आहेत, की तुम्हाला न्याय दिला जाईल. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्वजण उभे असतील तर त्यांना न्याय मिळाला अशी अपेक्षा करतो, असा टोला एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) लगावलाय. तर मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.

Published on: Aug 12, 2022 05:22 PM